Gavatil ek sunder Sandhyakal Nibandh: गाव म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत, सुंदर आणि निरागस जग. गावातील सकाळ जितकी प्रसन्न असते, तितकीच गावातील संध्याकाळ देखील मनाला मोहवून टाकणारी असते. मी जेव्हा माझ्या आजोळी जातो, तेव्हा तिथल्या संध्याकाळी अनुभवलेला तो वेळ अजूनही माझ्या मनात ताजा आहे.
संध्याकाळची वेळ झाली की गावात एक वेगळीच गडबड सुरू होते. शाळेतून घरी आलेली मुलं अंगणात खेळायला लागतात. काही जण फुगडी, लंगडी तर काही क्रिकेट खेळताना दिसतात. बैल आपल्या मालकासोबत शेतातून परत येतात. त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा मंजुळ आवाज सायंकाळच्या शांततेत एक सुरेल गाणी गातो, असं वाटतं.
आकाशात हळूहळू सुर्य मावळत असतो. केशरी-तपकिरी रंगांनी रंगलेलं आभाळ पाहताना मन वेडं होतं. पक्ष्यांचे थवे झुंडीने परतीच्या वाटेवर असतात. त्यांचे आवाज संध्याकाळी अजूनच जिवंत करतात. घराघरात चुली पेटतात आणि त्यातून येणारा धुरळा संध्याकाळच्या गार वाऱ्यासोबत मिसळतो.
आज्जी देवापुढे दिवा लावते, आणि घराघरात शांत, भक्तिमय वातावरण निर्माण होतं. लहान मुलं, मोठे, आजी-आजोबा सर्व एकत्र अंगणात बसतात. कुणी गप्पा मारतं, कुणी जुन्या गोष्टी सांगतं. त्या क्षणी मोबाईल, टीव्ही, गडबड – काहीच नसतं. असतो फक्त कुटुंब, निसर्ग आणि मनःशांती.
Arogya Hich Sampatti nibandh in marathi: आरोग्य हीच संपत्ती निबंध
माझ्या मते, गावातील सुंदर संध्याकाळ म्हणजे आयुष्यातला एक अमूल्य खजिना आहे. अशा वेळा आपण अनुभवाव्यात, आठवाव्यात आणि जपून ठेवाव्यात.
जरी मी शहरात राहत असलो, तरी गावातली ती संध्याकाळी माझ्या मनाच्या कोपऱ्यात नेहमीच जिवंत असते. ती संध्याकाळ मला प्रेम, शांतता आणि एकतेचा खरा अर्थ शिकवते.
1 thought on “Gavatil ek sunder Sandhyakal Nibandh: गावातील एक सुंदर संध्याकाळ निबंध”